Target 100 mt / Acre (Marathi)
एकरी 100 ट्न ..
एकरी 100 टन ऊस उत्पादन सहज शक्य !!
कृषिभूषण संजीव माने आष्टा 9404367518
"ऊस संजीवनी संजीव माने गृप"
यशस्वी उस बागायातिमध्ये अनेक विज्ञान विषयाचा सहभाग आहे. त्यात गणित,मृद स्थापत्य शास्त्र,मृद रसायन शास्त्र,मृद भौतिक शास्त्र,जीव रसायन शास्त्र,हवामान शास्त्र, सूक्ष्म जीव विद्न्यान, खनिज शास्त्र,वनस्पति शरीर शास्त्र,अर्थ शास्त्र, कृषिविद्या शास्त्र,कीटक शास्त्र आणि वनस्पति जनन शास्त्र यांचा प्रामुख्याने उल्लेख करावयास पाहिजे. या प्रत्येक शास्त्रातिल कांही आडाखे महत्वाचे आहेत की जे आपण आत्मसात केले पाहिजेत. तर आपण सहज 100 टन उत्पादन मिळवू शकतो.
दिलेल्या खतांचा योग्य वापर होण्यासाठी त्यांचे जमिनीत रासायनिक व जैविक रूपांतर व्हावे लागते. हे रूपान्तर जेवढे सुलभ व ह्ळु हळु होईल तेवढे शोषण चांगले होते. त्यामुळे वजनदार उस तैयार होण्यास मदत होते. अन्न द्रव्याचे शोषण चांगले होण्यासाठी जमिनीतील हवा व पाणी यांचा समतोल रहावा लागतो. हे सर्वस्वी जमिनीच्या भौतिक गुणधर्म व पाणि देण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.अन्नद्रव्य पुरावठ्याचा वेग हा जमिनितिल सेंद्रिय कर्बाचे प्रमाण,तिचा सामू व पोत यांवर अवलंबून असतो.आम्ल जमीनिस चुनखड़ी घालून व विम्ल जमिनिसा जिप्सम घालून व दोन्ही तर्हेच्या जमिनीत भरखते किंवा हिरवळिची खते वापरून अनुकुल वातावरण तैयार होते व उसाची निरोगी व सुयोग्य वाढ होण्यास मदत होते .
बऱ्याच जमिनीत दिलेले स्फुरद ख़त किंवा पालाश ख़त लगेच स्थिर होते. त्यामुळे पिकांना ही अन्नद्रव्ये मिळण्यात अड़चणी येतात. सेंद्रिय खताद्वारे खते दिल्यास हा प्रश्न सुटन्यास मदत होते.
मी ऊस पिकवान्याची सुरुवात 1988 साली सुरुवात केलि तेंव्हा लानानिचे उत्पादन 20 / 25 टन व खोडवा 10 / 12 टन प्रति एकर अशी सुरुवात झाली.
कृषिभूषण कै बाबुरावजी फ़ाळ्के यांचे दोन वर्षे मार्गदर्शन घेतले , उत्पादन हळु हळु वाढू लागले. 1994 पासून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव ज़ि सातारा इथे वारंवार भेट देवून ऊस उत्पादनाचे तंत्र समजावून घेण्यास सुरुवात केली.
त्या वेळी 5 बाबी / मुद्दे मला समजले आणि त्याच 5 मुद्यावर तेंव्हा पासून आज पर्यन्त ऊस शेती करीत आहे. 1996 / 97 साली 98.5 में टन प्रति एकर एवढे उत्पादन मिळाले , 2000 साली 102 टन, 2002 साली 105 टन, 2003 साली 107 टन .......2008 साली 121 टन, आणि आज पर्यंत सतत 100 टनाचे एकरी उत्पादन मिळते आहे.
5 मुद्ये अत्यंत महत्वाचे आहेत.
1) जमिनीची सुपिकता
2) ऊस लागनिची योग्य पद्धत
3) रासा खताच्या मात्रा
4) पाण्याचे नियोजन
5) पिक संरक्षण / व्यवस्थापण
1) *जमिनीची सुपिकता* -
जमीन सुपिक असल्या शिवाय कोणतेही पिक उत्तम येणार नाही. योग्य मशागत, योग्य प्रमाणात सेंद्रिय खते आणि जिवाणू यांचा योग्य वापर या मुळे जमीन सुपिक होते. सेंद्रिय ख़त म्हणजे शेणखत, कम्पोस्ट ख़त, गाण्डुळ ख़त, लेंडी ख़त, अखाध्य पेंड़ी , हिरवळिचे खत वगैरे होय. यांच्या वापरामुळे जमिनीची जडण घडण सुधारते, कणाची रचना सुधारते, ह्यूमसचे प्रमाण वाढून अन्न द्रव्ये व् उपयुक्त पाण्याची धारण शक्ति वाढते. सामू योग्य होतो, क्षारता सुधारते आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे 'सेंद्रिय कर्ब' वाढतो. सेंद्रिय कर्ब हे जिवाणुचे खाद्य आहे. त्याच्या मुळे जिवाणुनची संख्या आणि कार्यक्षमता योग्य रहाते. जमिनीत पुरवलेले अन्न घटक / खते पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य जमिनीतील विविध जीवाणु करीत असतात. जीवाणु योग्य प्रमाणात आणि कार्यक्षम असले की दिलेली खते पिकास भरपूर उपलब्ध होतात , त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. अशा अनेक बाबी सेंद्रिय खतामुळे सुधारतात आणि जमीन सुपिक रहाते.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अनेक प्रकारच्या स्वरूपात दिसून येतो.जमिनीत सूक्ष जीवाणु त्यांचे विघटन करीत असतात.या विघट्नातुन जे नवीन सेंद्रिय पदार्थ तयार होतात ते बऱ्याच प्रमाणात स्थिर स्वरुपाचे असतात.वैद्न्यानिक अर्थाने आपण त्यांना ह्युमस असे नाव् देतो.हयुमसयुक्त सेंद्रिय पदार्थ चार घट्कांमध्ये विखुरलेला असतो. त्याला ह्युमिक आसिड,फुलविक आसीड,ह्युमिन व् हेमाटोमेलानिन या नावाने संबोधले जाते.यांचे प्रमाण वेगावेगले असते त्यामुले जमिनीच्या गुणधर्मावर व अन्न्द्रव्य शोषणावर वेगावेगले परिणाम दिसून येतात.
ह्युमसमुळे भौतीक रासायनिक व जैविक
गुणधर्मात क्रांतिकारी बदल होतात.या बदलामुले जमिनिनिची सुपिकता पातली तर वाढ़तेच पण त्या बरोबरच तिची उत्पादन क्षमताही वाढते.
महाराष्ट्रातिल हवामान तसे उष्ण असलेणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी सतत कमी होंत असते आणि ती 0.6 च्या आसपास स्थिरवते.ही पातळी 0.8 च्या वर असावी. पण तसे पातळी गाठणे खुप जिकिरिचे असते.
सेंद्रिय कर्बाची पातळी योग्य ठेवाणेसाठी सेंद्रिय खते मुबलक पुरवावित.
शेणखत,कम्पोष्ट ख़त, गान्डुल ख़त, अखाध्य पेंडीचे मिश्रण, लेंडी ख़त, पोल्ट्री ख़त इत्यादि आणि या शिवाय अति महत्वाचे म्हणजे हिरवळिचे ख़त होय. आणखिणहि आपापल्या परिसरात उपलब्ध असणारे सेंद्रिय खते जमिनिस योग्य प्रमाणात पुरवावित.
महत्वाचे- सेंद्रिय कर्बामुळे जिवनुंचि संख्या आणि कार्यक्षमता सुधारते आणि अन्न घटकाचे उपलब्धिकरन मोठ्या प्रमाणात होते.
2) *ऊस लागणिचि योग्य पद्धत* -
कृषीभुषण संजीव माने आष्टा 9404367518
बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे.
जमिनीतील बुरशी आणि किड, ऊस उगवणि वर फार मोठा वाईट परीणाम करतात. उगवणीची टक्केवारी कमी कमी होत जाते. याठी बिज प्रक्रीया महत्वाची आहे.
बीज प्रक्रियेसाठी
1 बुरशी नाशक 2 ग्राम / लिटर पाणी
2 किटक नाशक 2 मीली / लिटर पाणी
या द्रावणात दहा मिनीटे व्यवस्थित बुडवुन घावेत.
3 उगवणीस पोषक असे काही निविष्ठा मिळतात. त्याचा उपयोग करावा. " जर्मिनेटर "
4 लागणिचे वेळी सरी मध्ये थिमेट फोरेट रिजेंट वगैरे प्रमाणाने वापरावे.
उगवण चांगली होणे . एका वेळी होणे . जोमाणे होणे . या बाबी उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्वाच्या आहे .
या साठी बिज प्रक्रीया महत्वाची आहेच. शिवाय बेसल डोस ही तेवढाच महत्वाचा आहे.
खालील बाबी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा.
नैसर्गिक रित्या प्रति एकारामध्ये पक्व ऊसाचि संख्या 35000 ते 45000 असते. "सरासरी 40000 असते" ! इथून पुढे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे, " एकरी पक्व ऊसाचि संख्या 40000 असते" !
सुरुवातीला म्हणजे लागण झाले नंतर येणार्या फुटव्यांची संख्या अति जास्त असते. जास्त म्हणजे किमान दिड दोन लाखा पेक्षा जास्त ! आणि एवढे जास्त असलेली फुटव्यां पैकी शेवटी उरतात फक्त 40000 पक्व ऊस !! बाकीचे फ़ुटवे बरेच दिवस जगतात, जमिनीत टाकलेले अन्न ( खते ) खात असतात आणि 4 / 5 महिन्यानंतर ह्ळु ह्ळु 'गर्दी' मुळे मरुन जातात. ते आपोआप मरत असतात , त्या साठी आपल्याला काही करायचे नसते.
इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या - शेवट पर्यन्त नैसर्गिक रित्या जगणारे पक्व ऊस ( 40000 ) आणि गर्दी होऊन मराणारे ( एक ते दोन लाख ) हे दोन्ही फ़ुटवे जमिनीतील अन्न समान खात असतात आणि समान वाढत असतात. 4/5 महिन्यानी त्यातील कमकुवत असणारे फुटवे हळु ह्ळु गर्दी मुळे मरायला लागतात. हे जे मरणारे फ़ुटवे आहेत ते जेवढे दिवस जगतात तेवढे दिवस जमिनीतील अन्न खात असतात. आणि 4/5 महिन्यानी गर्दिमुळे हळु ह्ळु मरुन जातात. यात काळजी करण्यासारखे म्हणजे असे अन्न खाऊन मरणार्यान्ची संख्या 'शेवट पर्यन्त जगणार्या फ़ुट्व्यापेक्षा' (पक्व ऊस) खुपच जास्त असते. जवळ पास 3 ते 5 पट जास्त! त्या मुले जमिनीत आपण टाकलेल्या खता पैकी खुप जास्त खत (3 ते 5 पट) मरणारे फुटवे खातात , आणि मध्येच मरुन जातात. त्या मुळे जगणार्याना खुप कमी खत खायला मिळते. याचा परिणाम त्यांची जाडी, उंची चांगली येत नाही, ऊस चांगल्या प्रकारे वाढत नाही ऊस बारीक रहातो आणि शेवटी उत्पादन कमी मिलते.
लक्षात घ्या, ऊस हे खादाड पिक आहे. त्याला सुरुवाती पासून आणि पुढेही वेळच्या वेळी संतुलित ख़त खायला मिळावे लागते. आणि यासाठी त्यांना स्पर्धा करणारे फ़ुट्व्यान्ची संख्या मर्यादित असावी लागते. योग्य असावी लागते.
आपल्या लक्षात आले असेल की; पक्व उसाला स्पर्धा करणारे फुटवे जास्त नकोत. आणि असे फुटवे जेवढे जास्त तेवढा पक्व ऊस किंवा शेवट पर्यन्त जगणारे ऊस,स्पर्धा करणार्या फ़ुट्व्यान्नि खत जास्त खाल्या मुळे बारीक रहातात, आणि त्यामुळे अपेक्षित आव्हरेज/ टनेज मिळत नाही. आम्हा खुप शेतकरयाना असे वाटते की, "ऊसाचे फ़ुटवे जेवढे जास्त तेवढा ऊस फार चांगला आला" असे आपण म्हणतो. एवढेच नव्हे तर आपण एकमेकाला सांगतो की; ऊसाला जेवढे फुटवे जास्त तेवढा ऊस चांगला.
पण असे नाही, फुटवे योग्य प्रमाणात असायला हवेत. कमी नव्हेत!! "योग्य" पाहिजेत. योग्य म्हणजे किती हे समजले पाहिजे.
आपण पाहिले आहे की आहे की, "नैसर्गिक रित्या एक एकरात सरासरी 40000 ऊस जगतात". आणि फुटवे 60000 ते 70000 असावेत. म्हणजे त्यातील 20000 30000 फुटवे वेगवेगळ्या कारणानि मरतात. म्हणजे काही खोड कीड़ी मुळे मरतात, तर काही बाळ भरणी आणि मोठी भरणीच्या वेळी मारतात. अशा मराणार्यांची सख्या कमी असावी. म्हणजे खत फार वाया जाणार नाही.
एकंदरीत सुरुवातीला 60000 ते 70000 फुटवे घ्यावेत आणि त्यातील 40000 ते 45000 फुटवे जगुन ते पक्व ऊस होतील.
@@@@सहजा सहजि लक्षात देवण्यासाठि
एकरी 40000 ते 45000 ऊस जगतात.
फुटवे 60000 ते 70000 असावेत.
* म्हणजेच एक चौरस फ़ुटास एक ऊस नैसर्गिक रित्या जगतो.
* आणि एक चौरस फ़ुटास सव्वा ते दीड पट फुटवे असावेत.
* 43560 चौ फ़ुट म्हणजे एक एकर क्षेत्र. आपण तोंडी हिशेब करणार आहोत म्हणून आपण 44000 चौ फूटाचा एक एकर समजू.
** आता वरील प्रमाणे, एका चौरस फ़ुटास एक ऊस जगतो म्हणजे एकाराचे चौरस फ़ुट 44000 म्हणजे एकरी सरासरी 44000 ऊस जगातील. म्हणजेच खरतर 35000 ते 45000 ऊस जगतात. हे लक्षात घ्या.
** आता फुटवे किती पाहू. ' सुरुवातीला सव्वा ते दिड पट फ़ुटवे ' म्हणजे 44000 चौ फ़ुटाचा एकर x सव्वा ते दिड पट फुटवे म्हणजे 60000 ते 65000 फुटवे घ्यावेत. या पेक्षा जास्त घेतले तर खाऊन मरणारे संख्या जास्त असल्यामुळे जास्त ख़त खातील; जगणार्याना कमी ख़त मिळेल आणि ते बारिक रहातील.
******
एक गणित पहा
समजा 5 फ़ुट रुन्दिची सरी आहे त्या सरिची 10 फ़ुट लांबी मोजावी आणि त्यातील फुटवे मोजावेत.
* 5 फ़ुट रुन्दिची सरी x 10 फ़ुट लांबी = 50 चौ फ़ुट,
* एका चौ फ़ुटात एक ऊस जगतो म्हणजे 10 फ़ुट लंबित शेवटी जगणारे ऊसाचि संख्या 50 असेल. हो एवढीच किंवा या पेक्षा कमीच असते, खात्री करून घ्या.
* आणि एका चौ फ़ुटात सव्वा ते दिड फुटवे म्हणजे 50 चौ फ़ुटात 60 ते 75 फुटवे असावेत. ऊसाचे वय 60 / 65 दिवसाचे दरम्यान ही संख्या असावी.
** आपण मोजलेले फुटवे वरील याचेशी तुलना करुन पहा. 5 फ़ुट रुन्दिच्या सरित आणि लांबी 10 फ़ुटात फुटवे 60 ते 75 असावेत. या पेक्षा जेवढे फुटवे जास्त त्या प्रमाणात उत्पादन कमी कमी मिळेल.
दोन महिन्याचे दरम्यान फुटव्यांची संख्या योग्य आले नंतर ऊसाचि "बाळ बांधणी" करावी. म्हणजे पुढे जादा फुटवे येणार नाहित आणि उत्पादनावर जादा फ़ुट्व्यान्मुळे वाईट परिणाम होणार नाही.
ऊसाचि "बाळ बांधणी" करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
बहुतेक आपण ऊसाचि "बाळ बांधणी" करत नाही. दुर्लक्ष करतो.
आता याच प्रमाणे गणित करावे.
सरिची रुंदी x सरिची लांबी = तेवढे जगणारे ऊस
सरिची रुंदी x सरिची लांबी = त्याचे सव्वा दीड पट फुटवे
*5 फ़ुट x 10 फ़ुट = 50 चौ फ़ुट, जगणारे 50 ऊस आणि फुटवे 60 ते 75
*6 फ़ुट x 10 फ़ुट = 60 चौ फ़ुट , जगणारे 60 ऊस आणि फुटवे 70 ते 90 फुटवे
*7 फ़ुट x 10 फ़ुट = 70 चौ फ़ुट, जगणारे 70 ऊस आणि 90 ते 110 फ़ुटवे
*4.5 फ़ुट x 10 फ़ुट = 45 चौ फ़ुट, जगणारे 45 ऊस आणि 60 ते 70 फुटवे
*4 फ़ुट x 10 फुटी = 40 चौ फ़ुट, जगणारे 40 ऊस व 55 ते 60 फुटवे
* 3.5 फ़ुट x 10 फ़ुट = 35 चौ फ़ुट, जगणारे 35 ऊस व 50 फुटवे
* 3 फ़ुट x 10 फ़ुट = 30 चौ फ़ुट, जगणारे 30 आणि फुटवे 45 असावेत
**** वरील प्रमाणेच फुटवे असावेत, हे निरिक्षण अत्यंत महत्वाचे आहे.
*कोणत्याही परिस्तिथित फुटवे प्रमाणा पेक्षा जास्त नकोत.
** यासाठी बाळ भरणी महत्वाची.
तरीही सरी किती फ़ुटाचि?
हा प्रश्न उरतोच.
वरील सर्व वाचुन समजाऊन घ्या. चिंतन करा!!!
**मागील अनुभव लक्षात आणा !
ज्या वेळी फुटवे कमी / योग्य होते तेंव्हा त्या त्या वेळी आपल्या ऊसाचि जाडी निश्चितच चांगली होती. हो ना?
*****आठवा!! 7527 हां ऊस!!. याला फ़ुट्व्याचि संख्या फारच कमी होती. हो ना? आता त्याची जाडी आठवा! कशी होती त्याची जाडी? एकदम मस्त ना? याचाच अर्थ फुटवे योग्य किंवा कमी म्हणजे योग्य वातावरणात जाडी जास्त !!!
***** आठवा!!! 86032 हा ऊस!! याला फुट्व्यांची संख्या जास्त असते, हो ना? आता फुटवे जास्त आले असतानाची जाडी आठवा!!! खुपच बारीक ना??? याचाच अर्थ , जेवढे फुटवे जास्त जास्त तेवढे उसाची जाडी बारीक बारीक.
***** आठवा !!! 0265 ऊस!!!! फुटवे मध्यम , जाडी चांगली!!!!
अशी खुप उदाहरणे देता येतील. आपणच निरिक्षण करा.
वरील बाबतीत सर्वच तज्ञ सहमत असतील असे नाही. पण तुमचे स्वत:चे निरिक्षण खोटे असणार नाही. निरिक्षण करा.
"योग्य फुटवे!! उत्तम ट्नेज!!!!
3) *रासा खाताच्या योग्य मात्रा* -
एक टन ऊस पिकवण्यासाठी NPK किती लागतो याची माहिती अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. त्यानुसार अपेक्षित उत्पादन मिळवणेसाठि एकूण किती NPK लागेल त्या पैकी जमिनीत शिल्लक असलेला वजा जाता वरून किती द्यावा या साठी विद्यापिठाने 'अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र' दिले आहे, त्यानुसार खताच्या मात्रा ठरवाव्यात आणि 6 ते 7 वेळा विभागून योग्य मात्रेत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी द्याव्यात.
*एकरी मात्रा 100 टन ऊस उत्पादन*
*लागणिस मी देत असलेली मात्रा*
1) सेंद्रिय ख़त 200 ते 500 किलो
डीएपी 100 किलो,
एमओंप़ी 100की,
सु अ द्रव्य 10किलो,
गंधक ग्रान्युअल 15 की,
माग सल्फेट 25 किलो.
सरीत टाकून मातीत मिसळुन घ्यावे.
2) 20 व्या दिवशी
यूरिया 50किलो सरित द्यावा.
3) 40 व्या दिवशी
यूरिया 100 किलो ,
लिम्बोळि पेंड 10किलो( जास्त नको)
मिसळुन सरित ध्यावे
4) 65 व्या दिवशी (बाळ भरणी)
यूरिया 50 किलो,
डीएपी 50 किलो,
एमओंप़ी 50 की
पहारिने छिद्रे घेऊन द्यावे.
6) भरणीचे वेळी
सेंद्रिय ख़त 200 ते 500 किलो ,
यूरिया 150 किलो,
डीएपी 100 किलो,
एमओंप़ी 75 की,
सु अ द्रव्य 10 किलो,
गंधक ग्रान्युअल 15 की,
माग सल्फेट 25 किलो.
7)मृग़ नक्षत्र निघाले नंतर द्यावे
24.24.0 100 किलो
पोट्यॅश 25 किलो
किंवा
अमोनियम सल्फेट 100 किलो
पोट्याश 25 किलो
**लागणिनंतर आणि मोठ्या बांधणिनंतर 10 दिवसांनी जीवाणु द्यावेत
आझोटो बैटर 2 लीटर किंवा 2 किलो
पि एस बी 2 लीटर किंवा 4 किलो
ट्रायको। 2 लीटर किंवा 2 किलो
ड्रिप मधून किंवा 100 किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावे.
**सुक्ष्म अन्न द्रव्ये देणे*
सुक्ष्म अन्न द्रव्ये व् मँग सल्फेट ही दोन्ही खते NPK बरोबर न देता थोड्या शेणखतात 5 ते 7 दिवस मुरवत ठेवावेत आणि नंतर द्यावेत. बेसल डोस देण्या आगोदर 5 ते 7 दिवस मिसळुन ठेवावे, आणि लागनिचे वेळी द्यावे.
या मुळे सुक्ष्म अन्न द्रव्यान्ना सेंद्रिय चे कोटिंग होते ,त्या मुळे NPK बरोबर त्याचे प्रेसीपिटेशन होत नाही. दिलेल्या खाताची उपयुक्तता पूर्ण पणे मिळते.
किंवा बाजारात चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये मिळ्तात ती वापरावीत. ती थोडी महाग आहेत.
मोठी बांधनी किंवा भरणी चे वेळी देखिल असेच करावे.
कृषिभूषण संजीव माने आष्टा
मी देत असलेली ही खते आहेत.
माती परीक्षणानुसार खताच्या मात्रा ठरवणे योग्य.
4) *पाण्याचे नियोजन* -
ऊसाचे मूळ परिसरात जेवढे पाणी उपलब्ध होइल तेवढेच फक्त वापरू शकते. मुलांच्या परिसरावरती अथवा खाली कितीही पाणी असले तरी त्याचा पिकाच्या दृष्टिने फारसा उपयोग होत नाही. दिलेले पाणी मुळाच्या परिसरात कसे राहील यावरच त्या पाण्याची उपयुक्तता अवलंबून असते. अथवा मूळांची वाढ भरपूर ती मुळे जमिनीच्या सर्व थरात कशी खालीवर खोल पसरतील हे पाहिले तरी पाण्याचा वापर योग्य त-हेने होण्यास मोठी मदत होते. भारी जमिनीचा पाण्याचा निचरा होण्याची क्षमता फारच कमी असते. त्यामुळे एकावेळी पाणी जास्त दिल्यास मुळांचे परिसरातील प्राणवायुचे प्रमाण घटल्याने मूळांची कार्यक्षमता एकदम कमी होऊन उभार वाढ खुंटते, नविन फुटवे येत नाहीत. आधी आलेले फुटवे मलूल होतात व् एकंदर पिकाचा जोरच कमी होतो. स-या तुडुम्ब भरुन पाणी वाहू लागेल अशा पद्धतीने पिकाला पाणी दिलेस वर उल्ल्हेख केलेले धोके प्रकर्षाने जाणवतात. माफक व मुरेल तेवढे पाणी एकावेळी पिकाला देणे नेहमीच फायदेशीर ठरते.
"थोड़े थोडे आणि सारखे सारखे पाणी द्यावे"
5) *फवारणी व्यवस्थापण* -
उस पीकाला हवा,पाणी,सूर्यप्रकाश ,तापमान, खते इ.सर्व घटक अनुकूल अशा मिळाल्या तर शरीरात जैव रसायने तैयार होतात.त्यातलाच एक प्रकार म्हणजे संजिवाके .
वैशिष्टे
*अत्यंत सूक्ष्म प्रमाणात तयार होतात.
*पान,मुळे,खोड यांच्या कोवळ्या अंकुरात होतात.तेथून जीते कार्य असते तिथे वाहून नेली जातात.
*बीजाचा रुजावा,कोम्ब येणे, पालवी फुटणे, मुळे सुटणे, कांड्याची संख्या, लांबी,जाडी , साखर प्रमाण इ. बाबी संजिवकान्च्या विशिष्ट सन्तुलनामुळे घडते.
*संजिवाकाचे संतुलन चांगले असेलतर जमिनीत दिलेल्या खताचे, पाण्याचे शोषण होते, गाळ्पा योग्य उसाची संख्या वाढते.
*फ़ोटोसिन्थेसिस होऊन टनेज वाढते.
*** कांही महत्वाचे***
*संजिवके म्हणजे NPK सारखे पोषण द्रव्ये नव्हे.
* संजिवके म्हणजे सूक्ष्म द्रव्ये नव्हे.
* संजिवके म्हणजे कीटक नाशक किंवा जंतु नाशक नव्हे.
* संजिवके म्हणजे जीवाणु किंवा सेंद्रिय ख़त नव्हे.
#ऊसामध्ये खालिल संजिवके वापरता येतात.#
1. ऑक्झिन्स उदा IBA NAA
2. जिबरेलिन उदा GA4 GA7 GA3
3. सायटोकायनिन उदा 6BA
4. ट्रायकन्टेनाल
5. पोलारिस
6. ग्लायाफोसेट
अलीकडे सागर वनस्पतीचे अर्क उपलब्ध झालेले आहेत. आस्कोफायलम नोडुसम या वनस्पति पासून तैयार करतात.त्यामध्ये संजिवाके आणि पोषण द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
उसाचे पेराची लांबी, जाडी आणि संख्या वाढवण्याचे काम संजिवकाचे फवारणिने शक्य होते
*फवारणी तक्ता* ( नवीन )
डॉ बालकृष्ण जमदग्नि यांच्या मार्गदर्शानाखाली लागण किंवा खोड्व्यास गेली 9 वर्ष या पद्धतीने "फ़वारणि" घेत आहे. कमी खर्चाची आणि फार उपयुक्त अशा या फ़वारण्या आहेत. अनुभव घेऊन पहा..
1) पहिली फवारणी
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान "खोड किड" येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
लागणी पासून 45 दिवसानी व खोडव्यासाठी तुट्ल्या पासून 30 दिवसानी आणि रोप लागणी नंतर 15 दिवसानी नंतर प्रत्येक 20 दिवसाचे अंतराने .
15 लिटरच्या पंपाने फवारणी. 60 लिटर पाणी पुरते.
# पोषण द्रव्ये #
*18:18:18 किंवा 19:19:19 - 600 ग्राम प्रती पंप 150 ग्रॅम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये- 160ग्रॅम प्रती पंप 40 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस - 120 मिली प्रती पंप 30 मिली
* बाविस्टिन - 120 ग्राम प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* IBA - 1 ग्रॅम
* 6 BA - 4 ग्राम
IBA अल्कोहोल (देशी दारु चालते) 20-30 मिली मध्ये आणि 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि 8 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उर्वरीत निविष्ठा मिसळुन पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 4 पम्प पुरतात.
2) दूसरी फवारणी. ( 90 लिटर पाणी पुरते )
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान "खोड किड" असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
लागणी पासून 65 दिवसानी व खोडव्यासाठी 50 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 किंवा 17:44:0 - 900 ग्राम प्रती पंप 150 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्रॅक्ट- 120 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस/ रोगोर- 180 मिली प्रती पंप 30 मिली
* बाविस्टिन/कार्बेंडिझम - 180 ग्राम प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 4 ग्राम
* SIX BA - 4 ग्राम
GA अल्कोहोल व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि 12 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उर्वरीत वरील निविष्ठा मिसळुन पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 6 पम्प पुरातात.
3) तीसरी फवारणी. ( 135 लिटर पाणि पुरते )
लागणी पासून 85 दिवसानी व खोडव्यासाठी 70 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 किंवा17:44: 0 - 1350 ग्रॅम प्रती पंप 150 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्रॅक्ट 180 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
* पोटॅशियम शोनाइट 1 किलो प्रती पंप 110 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* मोनोक्रोटोफॉस(आवश्यकतेनुसार)-270 मिली प्रती पंप 30 मिली
* हेक्झकोनेझॉल(आवश्यकतेनुसार)- 270 ग्रॅम प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 6 ग्राम
* SIX BA - 6 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि 18 लिटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 9 पम्प पुरातात.
4) चौथी फवारणी. ( 150 लिटर पाणि पुरते )
लागणी पासून 105 दिवसानी व खोडव्यासाठी 90 दिवसानी
ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे करता येण्याची शक्यता कमी असते.
# पोषण द्रव्ये #
*13:0:45 - 1000 ग्राम प्रती पंप 100 ग्रॅम
* पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 1 kilo प्रतीपंप 100 ग्रॅम
* ट्रायकाँन्टेनाँल 0.1 % - 500 मिली प्रती पंप 50 मिली
* सी विड एक्स्ट्राक्ट - 200 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
* क्विनॉलफॉस - 400 मिली प्रती पंप 40 मिली
* कार्बेंडॅझीम - 400 ग्रॅम प्रती पंप 40 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 7 ग्राम
* SIX BA - 7 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 10 पम्प पुरातात.
5) पाचवी फवारणी (शक्य झालेस)
( 180 लिटर पाणि पुरते )
लागणी पासून 125 दिवसानी व खोडव्यासाठी 105 दी
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 - 1350 ग्राम प्रती पंप 100 ग्रॅम
* माग्ने सल्फेट/ मॅग्ने नायट्रेट - 750 ग्राम प्रती पंप 60 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्राक्ट - 260 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
*क्लोरोपायरीफॉस - 400 मिली प्रती पंप 30 मिली
*हेक्झाकोनेझॉल - 400 मिली प्रती पंप 30 मिली
# संजिवाके #
* GA - 10 ग्राम
* SIX BA - 10 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 13 पम्प पुरातात.
वरील प्रमाणे आणि शास्त्र समजुन जर प्रयत्न केले तर एकरी 100 टनच काय तर माझ्या इकडे "एकरी 151" टनाचा प्रयोगही निश्चित पणे यशस्वी होणार यात शंकाच नाही.
*2017-18 या वर्षी आदरणीय शास्त्रद्न्यांचे मार्गदर्शनाखाली एकरी 200 टन ऊस उत्पादनाचा प्रयोग आम्ही काही शेतकरी करत आहोत.*
*कृषिभूषण संजीव माने आष्टा 9404367518*
*अजिंक्य माने* *9403964040*
*"ऊस संजीवनी संजीव माने गृप"*
USEFULL INFORMATION SIR
ReplyDeletei requested to u sir ple add mi in ur 150 tons group my mobile no. is - 8668571359
ReplyDeleteHello Sir, I'm shivajirao Jadhav, from Dudhondi village.
ReplyDeletePlease add my contact no. 9860404047
Hi Sir, Please add me, I am planing to cultivate Sugarcane in my land,
ReplyDeleteVijay Chandra Reddy
9849005478
माने साहेब, नावा प्रमाणेच आपण शेतकरी बांधवांनसाठी संजीवनी आहात, आपल्या या कार्याला सलाम
ReplyDeleteमला आपल्या ग्रुप मध्ये संधि द्या
अक्षय फाळके
9763279821
साताराराेड, ता.कोरेगाव, जि. सातारा
माने साहेब, नावा प्रमाणेच आपण शेतकरी बांधवांनसाठी संजीवनी आहात, आपल्या या कार्याला सलाम
ReplyDeleteमला आपल्या ग्रुप मध्ये संधि द्या
अक्षय फाळके
9763279821
साताराराेड, ता.कोरेगाव, जि. सातारा
Please Add my Mob no in Group : 9970357353 : Ravindra More Beed
ReplyDeleteplease add my mobile no on what's app group 9921336534
ReplyDeleteकृपया मला ग्रुपला ऍड करा
ReplyDeleteप्रवीण दानोळे 9422772269
Please add my mobile no. On what's up group 9767749559
ReplyDeletePlease add my mobile phone number 9767749559 Ishwar Gaikwad. Ramapur Talk. Kadegon District Sangli
ReplyDeleteदादा मलाही तुमच्या ग्रुप मध्ये घ्या हि विनंती माझा
ReplyDeleteमो.9545954755
Namaskar saheb please add in your group
ReplyDeleteMob no 9860224063
Akshay pawar Phaltan satara
Please add my mobile no. On what's up group +5212731107343
ReplyDeletePlz add me sir
ReplyDelete9404996273
योग्य माहितीमिळाली...👍
ReplyDeleteAdd me dada my Mobile no 7798629256
ReplyDeleteSir please add my no in your whatsApp group
ReplyDeleteNo is : 9970626471
Add my no 8408075940
ReplyDeleteAdd my no 8408075940
ReplyDeleteAdd my no 8408075940
ReplyDeleteप्रीतम दत्तात्रय घाडगे
ReplyDeleteचितळी,ता.खटाव,जिल्हा-सातारा
8055411182
कृपया समूहात सामील करावे ही विनंती
Mane sir can we have this writings in English version.. coz some farmers don't know Marathi language.. so plz upload it in english version if u have...
ReplyDeletePlz add my no 9930621001
ReplyDeleteSir please add my mamber
ReplyDeleteAditya nakhate
9021564492
Yavatmal
8446453186 plz add this number
ReplyDeleteKindly add in your group
ReplyDelete9693004056
9178099850
Please add me in group from belgaum Karnataka
ReplyDelete9164878858
Please add me whats up group
ReplyDeleteSanket bagal
Pune
9766514024
8554891216
ReplyDeletePlease add
Dear sir plz add my number to WhatsApp Group- 9510760563
ReplyDelete9921927900 please aid me with your group..
ReplyDelete9423594330 plz join wtsp group
ReplyDeleteCasinos Near by in Atlantic City, NJ - MapyRO
ReplyDelete1 Borgata 인천광역 출장안마 Way 속초 출장안마 Atlantic City, 보령 출장샵 NJ 08401. Directions · (609) 317-7777. 문경 출장마사지 Call Now · Full menu · More Info. Hours, Accepts Credit Cards, 울산광역 출장샵 Accepts
Sir add my number 8605094955
ReplyDeletePlease add me what's app number sir 7796790709
ReplyDelete